'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

वैजापूर | प्रतिनिधी

काल समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोल नाका येथे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या कारणावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना कुठलीही पूर्वसूचना न देता जांबरगाव टोलनाक्यावर बसत रस्ता अडवला होता. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती.

पोलिसांनी त्यांची समजूत काढूनही त्यांनी लवकर रस्ता मोकळा केला नाही. ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक शहराध्यक्ष अक्षरा घोडके, अभिषेक पवार प्रतीक लुटे, सुधीर सोमवंशी या चौघांवर वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवलदार सोनवणे हे करीत आहेत.

'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! खाजगी बसमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाका मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. दरम्यान, काल पुन्हा एकदा हा टोल नाका चर्चेत आला. या ठिकाणी काम करणाऱ्या स्थानिक मराठी कर्मचाऱ्यांना परप्रांतीय मॅनेजर धमकावत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांनी टोल नाक्यावर काम करणाऱ्या परप्रांतीय मॅनेजर यांना मारहाण केली. टोल नाक्यावर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण का करता म्हणत टोल नाका कंपनीच्या परप्रांतीय मॅनेजर आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेच्या नाशिक शहराध्यक्ष अक्षरा घोडके यांनी मनसे स्टाईलने उत्तर दिले. यावेळी त्यांनी परप्रांतीय मॅनेजर यांना मारहाण देखील केली.

'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
GPS वर डोळे झाकून विश्वास ठेवला अन् 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून ते…..
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com