अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी राहुरीत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी राहुरीत गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथून एका 17 वर्षीय मुलीचे तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची घटना सुमारे दीड महिन्यापूर्वी घडली. मात्र, मुलीचा शोध घेऊनही ती सापडत नसल्याने गुरूवारी दि. 10 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथे 17 वर्षीय मुलगी तिच्या आईवडिलांसोबत राहते. दि. 12 डिसेंबर रोजी रात्री नऊ ते पहाटे चार वाजे दरम्यान मुलीला तिच्या राहात्या घरातून तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात इसमाने तिला पळवून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील लोकांना ती मुलगी दिसली नाही. त्यांनी इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.

अखेर दि. 10 फेब्रुवारी रोजी त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार पोलीस अधिकार्‍यांसमक्ष कथन केला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com