धक्कादायक ! गाजराच्या हलव्यातून सुनेवर विषप्रयोग

तिसगाव येथील सासरच्या तिघांवर गुन्हा
धक्कादायक ! गाजराच्या हलव्यातून सुनेवर विषप्रयोग

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) तिसगाव (Tisagav) येथे नवविवाहितेवर गाजराच्या हलव्यातून (carrots) विषप्रयोग करून (Poisoning Try) तिचा खून (Murder) करण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादीवरून तिसगाव (Tisagav) येथील सासरच्या तिघां विरोधात पाथर्डी पोलिसात (Pathardi Police) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

नवरा वैभव बाळासाहेब पातकळ, सासरा बाळासाहेब लक्ष्मण पातकळ व सासू विजया बाळासाहेब पातकळ (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पातकळ कुटुंबातील नवविवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लग्नानंतर माहेरहुन आई-वडिलांकडून जमीन खरेदीसाठी चार लाख रुपये आणावेत म्हणून नवरा, सासरा, व सासू यांनी गाजराच्या हलव्यामध्ये विषारी औषध टाकून तो गाजराचा हलवा बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करून तिला कायमचे संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तीने केला आहे.

यापुर्वी वेळोवेळी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ (Physical and mental abuse) केला जात होता. नवविवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित तिघांविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही संशयित फरार असून पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ हे पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com