कार व ट्रकची समोरासमोर धडक

5 शनिभक्त जखमी
कार व ट्रकची समोरासमोर धडक

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-राहुरी रस्त्यावरील (Sonai Rahuri Road) महावितरणच्या ऑफिसजवळ रविवार 26 रोजी शनिभक्ताचे (Shani Devotee) चारचाकी वाहन व ट्रकची समोरासमोर धडक (Car Truck Accident) होवून झालेल्या अपघातात (Accident) वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतूक व गतिरोधकाचा प्रश्न समोर आला आहे.

कार व ट्रकची समोरासमोर धडक
पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

विटा (Vita) जिल्हा सांगली (Sangali) येथील मृणाली कदम, सनी भोसले, प्रज्ञा कदम, प्रफुल्ल यादव हे पुणे (Pune) येथे नोकरी करत आहेत. रविवारी सुट्टी असल्याने शिर्डी (Shirdi) येथे साईबाबांचे दर्शन (Saibaba Darshan) घेऊन राहुरीकडून (Rahuri) शनीशिंगणापूरकडे (Shanishinganapur) शनी दर्शनासाठी बोलेरो कंपनीच्या वाहनातून (एमएच11 उथ 9604 मधुन जात असताना सोनईकडुन राहुरीकडे जात असलेल्या ऊस वाहतूकीचा ट्रक क्र. चथअ 5527 यांच्यात ओव्हर टेक करत असताना समोरासमोर धडक झाली.

कार व ट्रकची समोरासमोर धडक
गायकर, घुले, जगताप यांच्यात रस्सीखेच ?

या दुर्घटनेत तीन पुरुष व दोन महिला जखमी (Injured) झाले या सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेतून अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयात नेले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातानंतर दोन्ही वाहने सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) आणलेली असून कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे कळते.

अवैध प्रवासी वाहने भरघाव वेगाने चालत असल्याने सोनई (Sonai) परिसरात कायमच छोटे-मोठे अपघात होत असतात. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कार व ट्रकची समोरासमोर धडक
गोदावरीचे दोन्ही कालवे आज वाहते होणार

मुळा संस्थेपासून महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधकाची अनेक दिवसांची मागणी असूनही ठेकेदार, सामाजिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक मोठे अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मुळा संस्थेपासून सोनई गावापर्यंत तातडीने गतीरोधक बसवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कार व ट्रकची समोरासमोर धडक
डॉ. शेखर यांच्या पोलीस पथकांचे नगर शहरात छापे गॅस रिफिलिंग
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com