कारची काच फोडून पावणे तीन लाख लांबविले

औरंगाबाद रोडवरील घटना; तोफखान्यात गुन्हा
कारची काच फोडून पावणे तीन लाख लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सीटवर ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगमध्ये तीन लाख 75 हजार रुपयांची रक्कम होती. नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक गौरव विनोद मोरे (वय 25 रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, गुलमोहर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ जी.एम. स्टाईल व भगवती ग्रेनाईटचे दुकान आहे. मंगळवारी दिवसभर व्यावसायातून जमा झालेले तीन लाख 75 हजार रुपये फिर्यादी यांनी एका बॅगमध्ये भरून त्यांनी ती बॅग त्यांच्या कार (एमएच 16 सीसी 7574) मध्ये सायंकाळी सात वाजता ठेवले.

कार दुकानासमोर व्यवस्थित लॉक करून पार्क केली होती. फिर्यादी काही कामानिमित्त दुकानात गेले. यानंतर चोरट्यांनी कारची काच फोडून तीन लाख 75 हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग चोरून नेली. फिर्यादी आठ वाजता कारजवळ आले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com