अज्ञातांनी रात्रीच्यावेळी बोर्‍हाडे यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या

अज्ञातांनी रात्रीच्यावेळी बोर्‍हाडे यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील कासारे येथील पत्रकार रामनाथ बोर्‍हाडे यांच्या ह्युंदाई कंपनीच्या ईऑन चारचाकी गाडीच्या काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्या. मंगळवार व बुधवार दरम्यान रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

कासारे येथील पत्रकार रामनाथ बोर्‍हाडे यांनी त्यांच्या घरासमोर रात्रीच्यावेळी चारचाकी उभी केलेली होती. अज्ञात व्यक्तीने मंगळवार व बुधवारी दरम्यान रात्रीच्या सुमारास सदर चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाच्या पाठीमागील भागाच्या काचा फोडल्या. त्यामुळे पत्रकार बोर्‍हाडे यांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी बोर्‍हाडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हा प्रकार कुणीतरी खोडसाळपणाने केल्याचा संशय आहे. दरम्यान सदर अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याचे पत्रकार बोर्‍हाडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com