
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कार-कंटेनरची (Car-Container Accident) समोरासमोर धडक (Hit) होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरूणांचा मृत्यू (Youth Death) झाला असून एक जण जखमी (Injured) झाला आहे. नगर-दौंड रस्त्यावरील हिवरेझरे (ता. नगर) शिवारात सोमवारी (दि. 23) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अक्षय भरत डोमसे (वय 30 रा. कोपरखैरणी, वाशी, नवी मुंबई) व आयुष संतोष पवार (वय 18 रा. अयोध्यानगर, श्रीगोंदा) अशी अपघातात (Accident) मयत झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. संजय तुकाराम काळे (वय 46 रा. पारगाव सुद्रीक ता. श्रीगोंदा) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. अक्षय डोमसे, आयुष पवार व संजय काळे हे कार मधून श्रीगोंदा (Shrigonda) येथून नगरच्या दिशेने येत होते तर कंटेनर नगर कडून श्रीगोंद्याच्या (Shrigonda) दिशेने जात असताना हिवरेझरे (Hivarezare) शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कार मधील अक्षय डोमसे व आयुष पवार यांचा मृत्यू झाला असून काळे जखमी झाले आहेत.
दुपारी दोनच्या सुमारास अपघात झाल्यानंतर हिवरेझरे परिसरात मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांसह रस्त्याने जाणार्या-येणार्या प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. त्यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.