गाडी खरेदी-विक्री व्यवहारात 14 लाखाची फसवणुक

तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माल वाहतुक गाडी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची 14 लाखाची फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गहिणीनाथ किसन दरेकर (वय 39 रा. शिराढोण ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

संजय शामसिंग परदेशी, वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा समशेर शाहीद अली सय्यद (वय 39, दोघे रा. कोकणीपुरा, नाशिक), अझहर हुसेन शेख (रा. साईनाथनगर, नाशिक) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. दरेकर यांनी संजय मुरलीधर दानवे (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) यांच्याकडून करारनामा करून माल वाहतुक गाडी (एमएच 16 सीसी 3346) विकत घेतली होती.

दरम्यान करोनामुळे ट्रान्सपोट व्यवसायाची परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी गाडीचे मुळ मालक दानवे यांना सांगून गाडी विक्रीचा निर्णय घेतला. गाडीवर असलेले एचडीएफसी बँकेचे 14 लाख रूपये कर्ज भरून गाडी निल करण्याचे अटीवर 23 नोव्हेंबर, 2020 रोजी नाथ मोर्टस, कराचीवालानगर, नगर येथे करारनामाकरून आरोपींच्या ताब्यात गाडी दिली.

परंतू आरोपींनी गाडीवरील 14 लाखाचे कर्ज भरले नसल्याने दरेकर यांनी गाडी निल करून द्या किंवा मला गाडी परत द्या, अशी विनंती केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. गाडीवरील 14 लाख रूपये कर्ज भरले नाही व गाडीही परत दिली नाही. आरोपींनी विश्वासघात करून 14 लाख रूपयांची फसवणुक केली असल्याचे दरेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com