स्विफ्ट कार व दुचाकीची धडक

एक गंभीर जखमी
स्विफ्ट कार व दुचाकीची धडक

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील नान्नज दुमाला (Nannaj Dumala) शिवारात स्विफ्ट कार व दुचाकीची धडक (Swift Car and Two Wheeler Collision) होत भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी (Injured) झाला. तळेगाव दिघे (Talegav Dighe) मार्गे असलेल्या लोणी ते नांदुरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला शिवारात गुरुवारी (दि. 4) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

स्विफ्ट कार व दुचाकीची धडक
संगमनेर येथील नामांकित रुग्णालयातील व्यवस्थापकाकडून महिलेचा विनयभंग

अपघाताच्या (Accident) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने स्विफ्ट कार (क्र. एमएच 15 एचवाय 0954) मधून चालक लोणीच्या (Loni) दिशेने प्रवास करत होता. दरम्यान नांदूर शिंगोटेच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीची (क्र. एमएच 17 एएक्स 6589) व स्विफ्ट कारची नान्नजदुमाला शिवारात समोरासमोर जोराची धडक झाली. झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार दत्तू सुखदेव लहामगे (वय 50, रा. मनेगाव ता. कोपरगाव) हे गंभीर जखमी (injured) झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेर (Sangamner) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्विफ्ट कार व दुचाकीची धडक
वाढवलेले पालिका प्रभाग, झेडपीचे गट रद्द होणार

घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रफिक पठाण व पोलीस नाईक अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान अपघातानंतर स्विफ्ट कार चालक मात्र पसार झाला. संगमनेर तालुका पोलिसांनी या अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघातात स्विफ्ट कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले. संगमनेर तालुका पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा तपास करीत आहे.

स्विफ्ट कार व दुचाकीची धडक
अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरू हत्याकांडातील मारेकरी राहुरीत जेरबंद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com