कारसह दीड लाखांची रक्कम चोरली

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची घटना
कारसह दीड लाखांची रक्कम चोरली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी केलेली कार व त्यातील एक लाख 45 हजार रूपयांची रक्कम, कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचे मालक चंद्रकांत बापुराव रहाणे (वय 62 रा. वांबोरी ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे मेव्हणे अशोक ज्ञानदेव चव्हाण (रा. बुर्‍हाणनगर ता. नेवासा) हे सोमवारी सायंकाळी फिर्यादीची कार (एमएच 17 बीएक्स 7761) घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी कार कार्यालयासमोरी रस्त्यावर उभी केली होती. ते कामानिमित्त कार्यालयात गेल्यानंतर पुन्हा सहा वाजेच्या सुमारास कार लावलेल्या ठिकाणी आले.

तेव्हा कार तेथे नव्हती. कारची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सात लाख रूपये किंमतीची किंमतीची कार, कारमधील एक लाख 45 हजार रूपयांची रक्कम, कागदपत्रे असा आठ लाख 45 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इनामदार करीत आहेत.

Related Stories

No stories found.