भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वैजापूर |ता. प्रतिनिधी| Vaijapur

शहरातील स्टेशन रस्त्यावरील जीवनगंगा वसाहतीजवळ वळण घेतांना भरधाव कारने धडक (Car Hit) दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही दुर्घटना शुक्रवारी घडली. यात सुरेश चरवंडे (रा.अगरसायगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश चरवंडे हे दुचाकीवर (एमएच 20 बीएच 3129) नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. जीवनगंगा वसाहतीजवळ वळण घेत असतांना रोटेगावहुन (Rotegav) वैजापुरच्या दिशेने जाणार्‍या कारने (एमएच 04 जुई 9131) त्यांना जोराची धडक (Accident) दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही धडक एवढी भयंकर होती की, दुचाकी (Bike) जवळपास शंभर फुट फरफटत गेली व दुचाकीस्वार हवेत उडत जोराने खाली कोसळले.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

त्यांना गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी जखमीस (Injured) तातडीने वैजापुर (Vaijapur) येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दरोड्याच्या तयारीतील टोळी सावेडीत जेरबंद
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com