
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील मढी खुर्द (Madhi Khurd) शिवारातील शिर्डी-नाशिक मार्गावर (Shirdi Nashik Highway) असलेल्या मढी खुर्द शिवारात कोल्हे वस्तीजवळ टोयोटा इनोव्हा या कारने दिलेल्या धडकेत (Car Bike Accident) देर्डे कोर्हाळे येथील दुचाकीस्वार अब्बास बाबुलाल सय्यद (वय 52) हा इसम जागीच ठार (Death) झाला.
तालुक्यातील मढी बु.शिवारात मढी (Madhi) फाट्याजवळ समोरून आलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या जोराची धडक दिली. यात देर्डे कोर्हाळे येथील रहिवासी असलेला इसम अब्बास बाबुलाल सय्यद (वय-52) हा ठार झाला आहे. या अपघातानंतर (Accident) संबंधित कार चालकाने त्यास उपचारार्थ दवाखान्यात दखल केले.