कार पल्टी होऊन एक ठार, तीघे गंभीर

जामखेडच्या बोरा कुटुंबावर शोककळा
कार पल्टी होऊन एक ठार, तीघे गंभीर

जामखेड |प्रतिनिधी|Jamkhed

पुण्यावरून नगरमार्गे जामखेड येथे येत असताना पोखरी फाट्याजवळ कार पल्टी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील एक ठार तर तिघे गंभिर जखमी झाल्याची घटना आज सकाळी नगर -जामखेड रस्त्यावर घडली.

जामखेड येथील भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (58) यांचा या अपघातात मृत्यु झाला. तर त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा (52), सून जागृती भूषण बोरा (28) व नात लियाशा भूषण बोरा (6) हे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे बोरा कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा हे काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत राजस्थानात देवदर्शनाला गेले होते.

काल रात्री ते विमानाने पुणे विमानतळावर पोहोचले. तेथून सर्वजण त्यांच्या वाहनातून जामखेडकडे निघाले. सकाळी त्यांची कार नगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली. तेथील पुलावर कार पलटी होऊन कोसळली. यामध्ये महेंद्र बोरा यांचे निधन झाले असून तीघे गंभिर जखमी आहेत. त्यांच्या नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com