भरधाव कारचा टायर फुटल्याने अपघात

जातेगाव फाटा येथे घटना; 7 जण जखमी
भरधाव कारचा टायर फुटल्याने अपघात
अपघात | Accident

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा परिसरात भरधाव कारचा टायर फुटून ती विरूद्ध दिशेने येणार्‍या कारवर आदळुन झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले आहेत.

पोलिस व प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवरी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अहमदनगरहून पुण्याच्या दिसेने जात आसलेल्या कारचा टायर फुटल्याने ती कार रोड दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने येत आसलेल्या कारवर आदळली यात दोन्ही गाडीतील चालकांसाह सात जण जखमी झाले. यातील पाच जणांना किरकोळ जखमा झाल्या असुन एक चालक व एक लहान मुलागा जास्त जखमी आहेत. यात दोन्हीही गाड्याचे नुकसान झाले.

जखमी ना स्थनीक नागरिकांनी जवळील रुग्णवाहीकातुन तात्काळ सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळचाच सुपा पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले तोपर्यत जखमीना उपचारासाठी पाठावले होते. सुपा पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सुपा पोलिस स्टेशनला उशीरापर्यत तक्रार दाखल झाली नव्हती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com