कार अपघातात बालक ठार, 6 जखमी

पाथर्डीतील मानमोडी येथे घटना
कार अपघातात बालक ठार, 6 जखमी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील मानमोडी (Manmodi) या ठीकणी ईरटीगा गाडीवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात (Car Accident) दीड महिन्यांचे बालक ठार (Child Death) झाले तर सहा प्रवासी जखमी (Injured) झाल्याची घटना शुक्रवारी (दि.5) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडले आहे.

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी
पवारांनी ‘राष्ट्रवादी’ला संभ्रमात टाकले

अंकुश बाबुराव अडळकर (45), सिताबाई अंकुश अडळकर(42), गंगुबाई भुजंगराव देखमुख (75), गंगुबाई बाबुराव अडळकर (70), पल्लवी नवनाथ देशमुख (14), रुपाली बालाजी देशमुख (26) हे या अपघातात (Accident) जखमी झाली आहे. हे सर्व जखमी पुणे (Pune) जिल्ह्यातले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डीतून (Pathardi) निर्मल- कल्याण (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाने (Nirmal- Kalyan (Visakhapatnam) National Highway) जाणारी ईरटीगा कार ही नगरच्या दिशेने जात असताना मानमोडी येथील धोकादायक वळणावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या बाजूला असलेल्याखड्ड्यात जाऊन पडली.

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी
रूपया पीक विमा योजनेत जिल्हा पहिल्या नंबरवर राहणार

अपघाताची (Accident) माहिती मिळताच रस्त्याहून जाणार्‍या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातात एक दिड महिन्याचा मुलगा मृत्यू (Death) झाला तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या दीड महिन्याच्या बालकावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्या बालकाचा मृत्यू (Child Death) झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे.

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी
जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी

मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम सुरु आहे असे सावधानगिरीचे  फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून भरधाव वेगाने येणार्‍या गाड्यांना अचानकपणे पुढे पुलाचे काम सुरू आहे असे लक्षात येऊन चालकाचा गोंधळ उडतो. त्यादरम्यान अपघाताचे (Accident) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी सावधगिरीचे फलक लावणे अत्यंत आवश्यक असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे.

कार अपघातात बालक ठार, 6 जखमी
साईबाबांविषयी चुकीची माहिती पसरविल्यास कठोर कारवाई करणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com