कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा; सात जणांविरूध्द गुन्हा

भिंगार कॅम्प पोलिसांत फिर्याद
कॅन्टोन्मेंट नाक्यावर राडा; सात जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-जामखेड रोडवरील (Nagar-Jamkhed Road) कॅन्टोन्मेंट नाक्यावर (Cantonment Naka) राडा झाला असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

रवी उर्फ धरम मुन्नु स्वामी (वय 45 रा. सदर बाजार भिंगार, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल काळे, संदीप म्हस्के, संतोष काळे, शुभम काळे, तुषार काळे, स्वप्नील काळे, सुरज शेळके यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत (Beating) फिर्यादी रवी स्वामी जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी स्वामी नगर-जामखेड रोडवर (Nagar-Jamkhed Road) असलेल्या कॅन्टोन्मेंट नाक्यावर (Cantonment Naka) गार्डचे काम करतात. सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान आठ जणांनी नाक्याची पावती फाडण्यावरून वाद करून फिर्यादीसह त्यांचा सहकारी विष्णू गव्हाणे याला लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत शिवीगाळ केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com