गांजाची वाहतूक करणाऱ्याला अटक; चार किलो गांजा जप्त

गांजाची वाहतूक करणाऱ्याला अटक; चार किलो गांजा जप्त

वैजापूर | प्रतिनिधी

स्कुटीवरुन गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास पोलिसांनी शनिवारी सायंकाळी येवला रस्त्यावरील विरभद्र मंदिराजवळ पकडले. त्याच्या ताब्यातुन पोलिसांनी ३९ हजार रुपये किमतीचा चार किलो ७० ग्रॅम गांजा हस्तगत केला असुन स्कुटीसह त्याला ताब्यात घेतले आहे. दिशान इम्रान शेख (२०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे त्यांचे नाव आहे.

नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावरुन दुचाकीवरुन गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवनसिंग राजपूत, कुलदीप नरवडे, प्रशांत गीते यांच्या पथकाने येवला रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. नाशिककडुन येत असलेल्या संशयास्पद स्कुटीला (क्रमांक एम एच २० जीएच ९२५३) थांबवत पोलिसांनी तपासणी केली असता स्कुटीवरुन गांजा आढळुन आला. गांजाचे मोजमाप करुन दिशान यास पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली आरोपीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असुन या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय विजय नरवडे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com