150 किलो गांजासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

जामखेडच्या दोघांना अटक
150 किलो गांजासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

तालुक्यातील ढोकसांगवी गावातील परीटवाडी येथे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून गांजा विक्रीसाठी आलेल्या जामखेड येथील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 150 किलो गांजा, कारसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित दोन महिला मात्र पसार झाल्या आहेत.

किरण आजिनाथ गायकवाड (वय 29 रा. मिलिंदनगर, ता. जामखेड) व मौलाना सत्तार शेख (वय 27 रा. तपणेश्वर रोड, हाडोळा, ता. जामखेड) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कारमधून दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक मांडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, शुभांगी कुटे, पोलीस कर्मचारी संतोष औटी, वैभव मोरे, विलास आंबेकर, ज्ञानेश्वर शिंदे, भाग्यश्री जाधव, उमेश कुतवळ, विजय शिंदे, मनीषा घुले यांच्या पथकाने परीटवाडी येथे जाऊन संशयित कार पकडली. त्यात 150 किलो गांजा मिळून आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com