गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले

कोतवाली पोलिसांची सबजेल रस्त्यावर कारवाई
गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गांजाची विक्री (Cannabis Sales) करणार्‍या तरूणाला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) सापळा लावून ताब्यात घेतले आहे. जुनेद मुजाहीद शेख (वय 33 रा.बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन, नगर) असे त्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून सहा हजार 200 रूपये किमतीचा 363 ग्रॅम गांजा जप्त (Cannabis Seized) करण्यात आला असून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले
नगर, नाशिक जिल्ह्याच्या धरणांसह जायकवाडीच्या पाण्याचा आढावा

शनिचौक ते सबजेल रस्त्यावर एका झाडाखाली पत्र्याच्या शेडच्या आडोशाला एक इसम गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मंगळवारी (दि.17) मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरक्षक यादव यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सबजेल रस्त्यावर सापळा लावून पथक थांबलेले असताना एक इसम पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत गांजा (Cannabis) आढळून आला. 62 पुड्यामध्ये एकुण 363 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे अधीक तपास करीत आहेत.

गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले
‘अर्बन’ च्या 131 संशयास्पद कर्ज फाईली जप्त

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दुर्गे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, याकुब सय्यद, राहुल गुंडु, प्रशांत बोरूडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले
नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी 95 कोटींचा आराखडा
गांजा विक्री करणार्‍या तरूणाला पकडले
ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com