10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तीन आरोपी जेरबंद || कोपरगाव शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

छत्तीसगड (Chhattisgarh) येथून कोपरगावात (Kopargav) विक्री करीता आणलेला 10 किलो गांजा (Cannabis) शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Kopargav Police And LCB) कोपरगवात पकडला. 3 मोबाईल, एक विना नंबरची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह तीन आरोपींना जेरबंद (Accused Arrested) करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगांव शहर पोलीस स्टेशनने केली.

10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट

अंमली पदार्थ (Narcotics) बाळगणार्‍या विरुध्द अंमली पदार्थ कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला पो.नि. दिनेश आहेर यांना आदेश दिलेले होते. या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, रविंद्र पांडे, सचिन अडवल, संतोष खरे, संभाजी कोतकर यांचे विशेष पथक स्थापन करुन बेकायदेशीर अंमली पदार्थ वाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना केल्या. पथकातील अधिकारी व अंमलदार असे शिर्डी पोलीस स्टेशन (Shirdi Police Station) हद्दीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत आजीम कुरेशी, रा. कोपरगाव व त्याचे दोन साथीदार असे काळया रंगाच्या ड्रिम युगा बिना नंबरच्या मोटार सायकलवरून ट्रिपल सिट साई कॉर्नर, कोपरगाव (Kopargav) येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहेत अशी बातमी मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन (Kopargav Police Station) येथे जावुन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना बातमीतील हकीगत सांगुन छाप्याचे नियोजन केले.

10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लाखो भक्तांनी घेतले साईसमाधीचे दर्शन

पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोउपनि रोहिदास ठोंबरे, गणेश काकडे, राम खारतोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी साई कॉर्नर येथे सापळा रचुन थांबले.हकीगतीमधील वर्णनाची मोटारसायकल व त्यावर तीन इसम येतांना दिसले. पथकाने योग्य त्या बळाचा वापर करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यात आरोपी अजीम जाफर कुरेशी, रा. संजयनगर, कोपरगाव, वाजीद कलीम कुरेशी, रा. संजयनगर, कोपरगाव, सुलतान रमजान अख्तर,रा. संजयनगर, कोपरगाव, यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता 10 किलो गांजा, 3 मोबाईल, विनानंबरची हाँडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा एकुण 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. पोलिसांनी गांजा कोठुन आणला याबाबत विचारपुस करता त्यांनी गांजा हा तौफीक तांबोळी इदगाह फाटा, लाकेनगर, रायपुर, छत्तीसगड याचेकडुन आणला असल्याचे सांगितले.

10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवाशात पावसात मोठी घट

पोहेकॉ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यत गु.र.नं. 503 /2023 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (क) व 29 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि प्रदिप देशमुख हे करीत आहे.

10 किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
श्रीरामपुरात उद्योग येत होते, तेव्हा ते कुणी पळवून लावले
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com