पाथर्डीतील गांजाच्या शेतीवर छापा

एलसीबी, पाथर्डी पोलिसांची संयुक्त कारवाई
पाथर्डीतील गांजाच्या शेतीवर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांजाच्या शेतीवर छापा टाकुन 36 हजार रुपये किंमतीची 55 लहान मोठी गांजाची झाडे जप्त केली आहेत. महादेव दादाबा खेडकर (वय 55 रा. मुंगूसवाडे ता. पाथर्डी) याच्याविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सुरेश माळी यांनी फिर्याद दिली आहे.

मुंगूसवाडे शिवारातील हॉटेल ओमकारचे बाजुस महादेव खेडकर याच्या मालकीच्या शेतात घराच्या मागे गांजाची झाडे लावलेली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार मनोहर शेजवळ, विष्णू घोडेचोर, बापूसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सुरेश माळी, विशाल दळवी, विनोद मासाळकर, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

एलसीबीच्या पथकाने पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक निरीक्षक कायंदे, सहाय्यक निरीक्षक वाघ व पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन मुंगूसवाडे शिवारातील गांजाच्या शेतात छापा टाकला. महादेव दादाबा खेडकर याच्या मालकीचे शेत गट क्र. 756 मध्ये गांजाची 55 हिरवी झाडे मिळून आल्याने ती कारवाई करून जप्त केली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com