27 किलो गांजा प्रकरणातील तिघा आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

27 किलो गांजा प्रकरणातील तिघा आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील चिलेखनवाडी (Chilekhanwadi) येथे सुमारे तीन लाख रुपये किंमतीचा गांजा (cannabis Case) बाळगल्याच्या प्रकरणी रात्री उशिरा नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला होता. अटक केलेल्या आरोपींपैकी एकजण अल्पवयीन असल्याने तिघा आरोपींना न्यायालयात (Court) हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) देण्यात आली.

याबाबत पोलीस नाईक बबन हरिभाऊ तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश मच्छिंद्र सावंत (वय 22), खंडू ऊर्फ रोहिदास भगवान गुंजाळ (वय 32), अजिंक्य त्रिंबक ससाणे (वय 23), एक अल्पवयीन मुलगा तसेच पसार आरोपी श्री. शेख ( पूर्ण नाव माहित नाही. रा. शेवगाव) यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 488/2021 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com