पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्तांकडून तरूणास बेदम मारहाण

काळकूप येथील घटना : पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्तांकडून तरूणास बेदम मारहाण

भाळवणी |प्रतिनिधी| Bhalavani

पारनेर तालुक्यातील काळकूप येथे ग्रामपंचायत निवडणूकीत भाषणे करून मतदारांना आकर्षित करणार्‍या भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना पाच जणांनी गाठून काठीने बेदम मारहाण केली.

अडसूळ (वय 39, रा. काळकूप, ता. पारनेर) हे भाळवणीवरून काळकूप येथे येत असताना वसंत भगवंत सालके व संदीप नाना सालके हे डस्टर गाडी रस्त्याला आडवी लावून अडसूळ यांची वाट पाहत होते. अडसूळ हे त्यांच्याजवळ पोहचताच तु ग्रामपंचायत निवडणूकीत लय भाषणे ठोकतो का? असा सवाल करून वसंत व संदीप यांनी भाऊसाहेब यांना अडविले.

नियोजनाप्रमाणे भाऊसाहेब यांना अडविण्यात आल्यानंतर बुलेटवरून ओंकार प्रदीप सालके, अतुल बबन सालके व किरण संदीप सालके हे घटनास्थळी आले. या पाचही जणांनी शिविगाळ करण्यात सुरूवात करून तुला लय माज आला का? असा दमही भरण्यात आला. बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर किरण संदीप सालके याने भाऊसाहेब यांच्या डोक्यात काठीचा जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.

घटनेनंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.जखमी भाऊसाहेब यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून वसंत भगवंत सालके, संदीप नाना सालके, ओंकार प्रदीप सालके, अतुल बबन सालके व किरण संदीप सालके यांच्याविरोधा पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com