पाटात झाड पडल्याने घाणीचे साम्राज्य

पाटात झाड पडल्याने घाणीचे साम्राज्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील पाटावरील भळगट दवाखाना ते स्मशानभुमी रस्त्यावर असलेल्या पुलाजवळील झाड पाटात आडवे पडले आहे. त्यामुळे पाटातून वाहून जाणारी घाण या झाडामुळे अडकून पडली आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून सदरचे झाड पालिकेने तातडीने दूर करावे, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी केली आहे

सध्या पाटाला पाणी आले असून त्या पाटात वाहत आलेली घाण या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली असून तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी याच्याकडे आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली असून पाटबंधारे, नगरपालिका प्रशासनाने संबंधित झाड काढून घाण साफ करून स्वच्छता राखावी, अशी मागणीही स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com