गुगळे, जामदार 'अर्बन'चे तज्ञ संचालक

गुगळे, जामदार 'अर्बन'चे तज्ञ संचालक

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर अर्बन बँकेत तज्ञ संचालकपदी चार्टर्ड अकाऊंटंट गौरव गुगळे व कायदेतज्ञ अॅड. राहुल जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल व ज्येष्ठ संचालक अनिल कोठारी यांनी या संचालकांचा सत्कार केला. यावेळी सहकार मंडळाचे प्रमुख सुवेंद्र गांधी, बँकेचे संचालक दिनेश कटारिया, कमलेश गांधी, केदार लाहोटी आदी उपस्थित होते.

नगर अर्बन बँक आज जरी आव्हानात्मक परिस्थितीतून जात असली तरी बँकेवरचा विश्वास कायम आहे. बँक पूर्वीप्रमाणे प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेले निर्बंध लवकरात लवकर दूर व्हावेत यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचे व विविध संस्थांचे सहकार्य घेत आहे. याचाच एक भाग म्हणून बँकेत तज्ञ संचालकांची नियुक्ती करत आहोत. सध्यस्थितीत बँकेला अर्थ व कायदेशीर सल्लागारांची फार गरज असल्याने प्रथितयश चार्टर्ड अकाऊंटंट गौरव गुगळे व कॉर्पोरेट लॉ तज्ञ असलेले अॅड. राहुल जामदार यांची बँकेच्या नूतन तज्ञ संचालकपदी नियुक्ती केली. यांचा अनुभव व ज्ञानाचा फायदा अर्बन बँकेला होणार आहे, असे प्रतिपादन नगर अर्बन बँकेच्या सहकार मंडळाचे प्रमुख सुवेंद्र गांधी यांनी केले.

गौरव गुगळे यांनी याआधीही अर्बन बँकेचे तज्ञ संचालक म्हणून काम केले आहे. त्यांना बँकिंग क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. राहुल जामदार यांनी सिंबायोसिस या अंतरराष्ट्रीय विद्यापीठातून कॉर्पोरेट लॉची पदवी घेतलेली आहे. दोन्ही संचालकांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा अर्बन बँकेला अडचणीतून व संकटातून बाहेर काढण्यासाठी होईल, असा विश्वास बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी नाना जेवरे, अभिषेक दायमा, सुमित देवतरसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com