192 ग्रामपंचायतीमध्ये होणार पोट निवडणूक

वेगवेगळ्या कारणामुळे 274 जागा रिक्त
192 ग्रामपंचायतीमध्ये होणार पोट निवडणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निधन (Death), राजीनामा (Resigned), अपात्रता (Disqualification) व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य (Grampanchayat Member) पदासाठी राज्यातील 4554 ग्रामपंचायतीमधील 7130 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम (By-Election Program) राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदार घेण्यात येणार आहे. नगर जिल्हयातील (Ahmednagar District) 192 ग्रामपंचायती मधील 274 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे (Gram Panchayat By-Election) सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देणारे परिपत्रक नगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठविले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम ( Election Program) घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत. या निवडणूकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 9 डिसेंबर 2021 उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी (voter list) प्रसिध्द केली आहे. तर अंतिम मतदार यादी 18 नोव्हेंबररोजी प्रसिध्द केली आहे. सर्व जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून सदर पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राबवावा. तसेच राज्य शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे ही पालन करण्यात यावे. अशा सूचना राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी परिपत्रकात नमूद केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com