पैशासाठी व्यावसायिकाला ठार मारले

वाळकीतील घटना || गुन्हेगार कासार बंधुंसह चौघांवर गुन्हा
पैशासाठी व्यावसायिकाला ठार मारले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाळकी (ता. नगर) (Walaki) येथे रविवारी (दिनांक 30 एप्रिल) सायंकाळी दोन गटांत तुफान हाणामार्‍या (Two Group Fight) झाल्या होत्या. या हाणामारीत कापड दुकानदार व्यावसायिक नाथा ठकाराम लोखंडे (वय 49 रा. वाळकी) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन जण जखमी (Injured) झाले आहेत. या प्रकरणी सराईत गुन्हेगार इंद्रजीत रमेश कासार, विश्वजित रमेश कासार यांच्यासह शुभम ऊर्फ भोले जनार्धन भालसिंग, अशोक ऊर्फ सोनू गुंड (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. वाळकी) यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा (Murder) तसेच खंडणीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

याबाबत मयत नाथा ठकाराम लोखंडे यांचा मुलगा अनुराज नाथा लोखंडे (वय 22 रा. वाळकी) यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये त्याने म्हटले आहे की, त्यांची चुलती शोभा लोखंडे या रविवारी सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास त्यांचे कासार मळा येथील घरासमोर असताना तेथे इंद्रजित कासार व शुभम उर्फ भोले भालसिंग हे दोघे विना क्रमांकाच्या दुचाकीवर आले व त्यांनी दादागिरी करत शोभा लोखंडे यांच्याकडे दोन लाख 70 हजारांची खंडणीची (Ransom) मागणी केली.

त्यांनी तुम्हाला का पैसे द्यायचे असे म्हटले असता त्याचा राग येवून त्या दोघांनी शोभा लोखंडे यांना शिवीगाळ, दमबाजी, धक्काबुक्की केली. त्यावेळी फिर्यादीचे वडील नाथा ठकाराम लोखंडे तेथे आले व त्यांनी इंद्रजित कासार व शुभम भालसिंग यांना म्हणाले की कशाचे पैसे द्यायचे? काय कारण असे ते म्हणाले असता इंद्रजीत म्हणाला की तुम्हाला दुकान चालू ठेवायचे असेल तर तर तुम्ही पैसे देवून टाका असे म्हणून दोघांनी नाथा लोखंडे यांना शिवीगाळ करून त्यांचे पोटात व छातीत लाथा मारून बेशुध्द करून जिवे ठार मारले.

तसेच यातील विश्वजीत कासार व अशोक उर्फ सोनू गुंड यांनी फिर्यादीस तसेच फिर्यादीचा भाऊ रवी व चुलते शिवाजी लोखंडे यांना फोनवरून शिवीगाळ करून दुकान चालू ठेवण्यासाठी फोनवरून खंडणी (Ransom) मागून ती त्याचा भाऊ इंद्रजित कासार याच्याकडे तो जेवढे मागतोय तेवढे देवून टाक असा दम दिला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यावर पोलिसांनी इंद्रजित रमेश कासार व शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग या दोघांना ताब्यात घेतले असून त्यापैकी जखमी इंद्रजित यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात (Civil Hospital) दाखल केले आहे. तर शुभम ऊर्फ भोले याला अटक (Arrested) केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com