व्यावसायिकाचे घर फोडून सात लाख लांबविले

पोलिसांत गुन्हा
व्यावसायिकाचे घर फोडून सात लाख लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायिकाचे बंद घर फोडून कपाटात ठेवलेले सात लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले. 17 ऑगस्ट सकाळी सहा ते 27 ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शहरातील विनायकनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी व्यावसायिक शांतिलाल गणेशरामजी चौधरी (वय 33 रा. अरिहंत अपार्टमेंट, विनायकनगर) यांनी सोमवार, 29 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतिलाल चौधरी 2016 पासून त्यांचे मेव्हुणे कांतिलाल चौधरी यांच्याकडे राहतात. त्यांची पत्नी व मुलगा मूळगावी अर्जी (ता. आहोर जि. जालोर, राज्यस्थान) येथे राहतात. शांतिलाल व कांतिलाल यांचे कोर्टगल्लीत ऑप्टीकल नावाचे चष्म्याचे दुकान आहे. शांतिलाल यांनी 15 ऑगस्ट रोजी व्यवसायातून जमा झालेले सात लाख रुपये कपाटामध्ये ठेवले होते. ते 17 ऑगस्ट रोजी मुलगा अजारी असल्याने त्यांच्या मूळगावी अर्जी येथे गेले होते. दरम्यान मुलाचे निधन झाल्याने ते तिकडेच थांबले होते.

25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता शांतिलाल यांचे मेव्हुणे कांतिलाल यांनी त्यांना फोन करून सांगितले की,‘सकाळी नऊ वाजता घराला कुलूप लावून आम्ही सर्वजण दुकानात गेले होतो, रात्री 10 वाजता घरी आलो तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे दिसत आहे’. माहिती मिळताच शांतिलाल 27 ऑगस्ट रोजी विनायकनगर येथील घरी आले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता त्यांनी ठेवलेले सात लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान शांतिलाल यांनी सोमवारी दुपारी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com