व्यावसायिकाला मारहाण करत लुटले

नगर तालुक्यातील घटना || सहा जणांविरूध्द गुन्हा
व्यावसायिकाला मारहाण करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेल व्यावसायिकाच्या (Hotelier) डोळ्यात मिरची पुड टाकून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत त्यांच्याकडील एक लाख 67 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटला (Robbed). नगर तालुक्यातील हातवळण (Hatvalan) ते रूईछत्तीशी रोडवरील (Ruichattishi) रूईछत्तीशी शिवारात भुजबळ वस्तीजवळ सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) बाळासाहेब सायंबर, संदीप सदाशिव सायंबर यांच्यासह चार अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

व्यावसायिक रघुनाथ एकनाथ मेटे (वय 50 रा. नगर - दौंड हायवे, हनुमाननगर, अहमदनगर) यांना लुटण्यात (Robbery) आले. असून त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी रघुनाथ मेटे यांचे हातवळण (Hatvalan) गावात हॉटेल आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून सोमवारी हॉटेल बंद करून घरी जात असताना भुजबळ वस्तीजवळ तीन दुचाकीवरून (Two-wheeler) आलेल्या व्यक्तींनी मेटे यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली.

मेटे यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून तलवारीचा धाक (Fear) दाखविला. त्यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करण्यात आली. त्यांच्या खिशातील 70 हजार रूपयांची रोख रक्कम, 37 हजार 500 रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 60 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन असा एक लाख 67 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.