बस प्रवास करतांना महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी

बस प्रवास करतांना महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बसमध्ये (Bus) जवळ बसलेल्या अनोळखी महिलेने (Woman) करंजी ते पाथर्डी (Karanji to Pathardi) असा प्रवास करता असताना एका महिलेच्या बॅगेतून (Bag) एक लाख तेरा हजार पाचशे रुपयांची सोन्याचे दागिने (Gold jewelry) व रोख रक्कम चोरून (Stealing) नेले आहे. पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) धारवाडी येथील महिला कमल देविदास गवळी (वय 35) ह्या रविवारी सकाळी तालुक्यातील मोहरी (Mohari) या गावी भाच्याच्या लग्नासाठी करंजी (Karanji) येथून एसटी बसमधून (ST Bus) पाथर्डीकडे (Pathardi) प्रवास करायला बसल्या होत्या.

त्यावेळी या प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून 27000 हजार रुपये किमतीचे दोन सोन्यांचे झुंबर, 3000 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचा वेल, 45000 हजार रुपये किंमतीचाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 27000 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पोत मधील मणी, 9000 हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुशी, 1500 हजार रुपयेची एक नाकातील सोन्याची नथ व 1000 रूपये रोख रक्कम असा एकूण 1,13500 रु एकूण सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.

गवळी या मोहरी याठिकाणी आले असता त्यांचे दागिने बॅगेत नसल्याचे लक्षात आले. बसमध्ये बसलेल्या अनोळखी महिलेने गवळी यांच्या बॅगमधील पाकिट काढुन घेतले अशी खात्री पटल्यांनंतर कमल गवळी यांच्या फिर्यादीवरून अनोेळखी महिले विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.