
बोधेगाव | प्रतिनिधी
शेवगाव-गेवराई राज्य मार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. यात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर महामंडळाची अहमदनगर- पुसद ही नव्याने सुरू झालेली एसटी बस आज शनिवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास शेवगावहुन -गेवराईच्या दिशेने जात असताना राक्षी नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर चापडगावहुन शेवगावच्या दिशेने जाणारा फळ माल वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाला.
यात होऊन टेम्पो चालक जागीच ठार झाला तर एसटी बस चालक भोपालसिंग जाणूसिंग पवार (रा पुसद जि यवतमाळ) व बसमधील प्रवासी आकाश भगवान रोठे (रा बीबी ता लोणार जि बुलढाणा) हल्ली नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी हे अपघातात जबर जखमी झाले. तर वाहक संतोष सीताराम आढाव व इतर प्रवाश्यांना जबर मार लागला आहे. जखमींवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.