बसमधून उतरताना अडीच लाख लांबविले

कायनेटीक चौकातील घटना || पोलिसांत गुन्हा
बसमधून उतरताना अडीच लाख लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेकडील अडीच लाखाची रोकड बस मधून खाली उतरत असताना चोरट्यांनी लांबविली. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी कायनेटीक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी मनीषा नवनाथ मासाळ (वय 41 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी 18 ऑक्टोबर रोजी त्यांचा भाऊ धनंजय पोपटराव वाघमोडे (रा. कर्दनवाडी लासुरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी भावाकडून अडीच लाख रुपये घेतले. ते पैसे त्यांनी प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवले व त्या पैसे घेऊन 20 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता नगर येथे येण्यासाठी सांगली ते छत्रपती संभाजीनगर बसमध्ये बसल्या होत्या. त्या दुपारी साडे चारच्या सुमारास कायनेटीक चौकात बसमधून उतरल्या.

फिर्यादी बसमधून खाली उतरत असताना बसमध्ये खूप गर्दी होती. त्यांना घेण्यासाठी त्यांचे पती आले होते. त्या पतीसोबत घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी पिशवीमध्ये ठेवलेली रोकड पाहिली असता त्यांना दिसली नाही. त्यांनी कायनेटीक चौक गाठून शोध घेतला असता त्यांना रोकड मिळून आली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार सोनवणे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com