कंटेनरच्या धडकेत एसटी पल्टी

चालक वाहकासोबत 41 प्रवासी बालमबाल बचावले
कंटेनरच्या धडकेत एसटी पल्टी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे महामार्गावर (Nagar Pune Highway) सोमवारी दुपारी कामरगाव (ता. पारनेर) (Kamargav) येथे एसटी बस व कंटेनर यांच्यात (ST Bus and Container Accident) अपघात होऊन दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने एसटीमधील प्रवासी आणि चालक- वाहक हे सुखरूप बचावले आहेत.

याबाबत प्रत्यक्षदर्क्षी एसटीमध्ये प्रवास करणारे गोगटे यांनी सांगितले, मंडणगड डेपोची बस क्रमांक एमएच 20 बीएल 2779 ही एसटी बस शिर्डीकडून (Shirdi) नगर-पुणे महामार्गावरुन (Nagar Pune Highway) जात असतांना सोमवारी दुपारी कामरगाव (Kamargav) शिवारात आल्यावर कंटेनर (Container) (एमएच 46 सीएम 6559) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो कंटेनर एसटी बसवर जोरात आदळून पुढे पलटी झाला. एसटी बस (ST Bus) चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

त्यामुळे गाडी रोडच्या बाजूला जाऊन तिरपी अर्धवट पल्टी झाली. परंतु एसटीबसमधील (ST Bus) कुणालाही काहीही झाले नाही. एसटीमध्ये चालक वाहकासोबत 41 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना इतर बसमध्ये बसवून मार्गस्थ केले असल्याची माहिती चालक पाडूरंग दाते यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस स्टेशनचे (Nagar Taluka Police Station) कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन त्यांनी सविस्तर माहिती घेत पंचनामा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com