खासगी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खासगी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देवदर्शनावरून घराकडे दुचाकीवरून परतत असताना भरधाव वेगातील खासगी आराम बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत 28 वर्षिय तरुणाचा मृत्यू झाला. रवींद्र विलास लष्करे (रा. देहरे ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना नगर-मनमाड महामार्गावर देहरे गावच्या शिवारात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

रवींद्र हा नगर एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. देहरेपासून जवळच असलेल्या शिंगवे गावात असलेल्या शनि मंदिरात सकाळी तो दुचाकीवरून दर्शनासाठी गेला होता. तेथून माघारी परतत असताना देहरे गावच्या शिवारात नगरहून राहुरीच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या खासगी आराम बसने त्याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com