बुरूडगाव ग्रामस्थांकडून कचरा डेपोला टाळे

आश्वासन देऊनही सुविधा न दिल्याने ग्रामस्थ संतप्त
बुरूडगाव ग्रामस्थांकडून कचरा डेपोला टाळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुरूडगाव कचरा डेपो (Burudgaon Garbage Depot) परिसरात रस्ते (Road) व लाईटच्या सुविधा न दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक (Villagers are Aggressive) झाले आहेत. तसेच ग्रामस्थांना आश्वासन देऊनही पाणीपुरवठा (Water supply) न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या कचरा गाड्या (Municipal Garbage Trucks) अडवून बुरूडगाव डेपोला टाळे (Burudgaon Depot Lock) ठोकले आहे. कचरा डेपोसाठी (Garbage Depot) ग्रामपंचायतीने दिलेली ‘ना हरकत’ रद्द केल्याचे पत्रही ग्रामपंचायतीने महापालिकेला सादर केले आहे. दिवसभर डेपो बंद (Depo Close) असल्यामुळे कचरा गाड्या तशाच परत पाठवण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या बुरूडगाव कचरा डेपो येथील सुविधा, ग्रामपंचायतीला केला जाणारा पाणीपुरवठा आदी मद्द्यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. बुरुडगाव कचरा डेपो परिसरात रस्ते, लाईटच्या सुविधा, तसेच महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्याच्या अटीवर बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला कचरा डेपोसाठी ना हरकत दिली होती. तसेच बुरुडगाव येथे 100 टन क्षमतेचा प्रकल्प असून, या डेपोत 100 कचरा पाठवावा. उर्वरित 50 टन कचरा सावेडी डेपोमध्ये पाठवावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नाही.

त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, बुरुडगाव डेपोला टाळे ठोकण्यात आल्याचे सरपंच बापूसाहेब कुलट यांनी सांगितले. आंदोलनाची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शंकर शेडाळे व अभियंता रोहिदास सातपुते यांनी ग्रामस्थांशी व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. आज, बुधवाार यासंदर्भात महापालिकेत बैठक घेऊन विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

मात्र, बुरुडगावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवत कचरा डेपो उघडणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी महापालिकेत बैठकीला येणार नाहीत. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बुरुडगावला येऊन तेथील ग्रामस्थांसमोर बैठक घ्यावी, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी सरपंच बापूसाहेब कुलट, उपसरपंच सिराज शेख, खंडू काळे, दिलीप पाचारणे, किशोर कर्डीले आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.