तळेगाव दिघे l वार्ताहर

संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात वायरिंगचे शॉर्टसर्किट होत छोट्या टेम्पोला आग लागली. लागलेल्या आगीत संपूर्ण टेम्पो जळाला.

या घटनेतून चालक मात्र बचावला. बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील निळवंडे कॅनॉलनजीक ही घटना घडली. यावेळी ग्रामस्थांनी बर्निंग टेम्पोचा थरार अनुभवला.

कोपरगाव येथून चालक राम ज्ञानेश्वर नागरे ( वय ३२ वर्षे रा. कोपरगाव ) हे छोट्या टेम्पोमध्ये ( क्रमांक एमएच १७ बीडी १५९७ ) मोबाईल टॉवरसाठी ऑईल व डिझेलचे कॅन घेवून तळेगाव दिघे गावाकडे येत होते. दरम्यान तळेगाव शिवारातील निळवंडे कॅनॉलनजीक आला असता पाठीमागून येणाऱ्या प्रवाशांनी श्री. नागरे यांनी पाठीमागून टेम्पोला आग लागल्याचे सांगितले. दरम्यान चालक श्री. नागरे यांनी सदर छोटा टेम्पो ररस्त्याच्याकडेला घेतला. तोपर्यंत टेम्पोतील ऑईल व डिझेलचे कॅन पेट घेतल्याने भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी व रहिवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केअला. संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबने आग विझविली. मात्र तोपर्यंत छोटा टेम्पो जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. वायरिंगचे शॉर्टसर्किट होत छोट्या टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली. सुदैवाने टेम्पो चालक मात्र या घटनेतून बचावला. या आगीत टेम्पोचे मोठे नुकसान झाले. यावेळी ग्रामस्थांनी बर्निंग टेम्पोचा थरार अनुभवला.