शॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही वेळानंतर आग विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दशरथ पवार यांच्या रानातील ऊसाचे २ एकर क्षेत्र जळीत झाले. शर्तीच्या प्रयत्नानंतर आग विझल्याने शेजारी असलेला १० एकरावरील ऊस आगीपासून बचावला. अंकुश देवकर व गितेश काशिनाथ पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com