
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दिवसा घरफोड्या (Burglary) करणार्या सराईत गुन्हेगारासह दोन अल्पवयीन मुलांना (Minor Child) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB) ताब्यात घेतले. रोहित नादर चव्हाण (वय 21 रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे सराईत गुन्हेगारांचे नाव असून त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार चव्हाण हा अल्पवयीन मुलांना (Minor Child) सोबत घेऊन दिवसा घरफोड्या (Burglary) करत असल्याचे समोर आले आहे.
त्यांनी नगर शहरातील सावेडी नाका (Savedi) व पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील शेकटे येथे घरफोडी केल्याची कबूली दिली असून त्यांच्याकडून दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry), रोकड असा एक लाख 10 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोमनाथ म्हातारदेव घुले (रा. शेकटे) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 70 हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी घुले यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) फिर्याद दिली होती. या घरफोडीसह अन्य घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांचे पथक चिचोंडी पाटील परिसरात रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना काही संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळु लागले. पथकाने संशयीतांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबूली दिली आहे.
रोहित नादर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द नगर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे एकुण सात गुन्हे दाखल आहेत.