
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील वाडेगव्हाण शिवारातील बेलवंडी फाटा परिसरातील शनिवारी (दि.6) रात्री एका हाँटेल व एका घरात चोरट्यानी मोठा हात मारत लाखो रुपयाचा ऐवज पळवला असुन यात रोख रक्कम, दागीने व हजारो रुपयाची महागडी दारुही पळवली आहे.
याप्रकरणी सुनिल राक्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी बेंलवडी फाटा येथील हाँटेल सुप्रिम येथे चोरी करीत गल्लातील 12 हजार 30 रुपये रोख रक्कमेसह विविध प्रकारच्या शंभर पेक्षा जास्त दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. एकूण चोरी गेलेल्या दारुची किमत 36 हजार 380 रुपये आहे.
तसेच यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील सिद्देश पंढरीनाथ कदम यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरातील दागिने व रोख रक्कम असा एकुण 85 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सुपा पोलिसांनी सुनिल राक्षे व सिद्धेश कदम यांच्या फिर्यादीवरुन आज्ञात चोरा विरुध गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सा.फौ. पठाण पुढील तपास करत आहेत.
मागील काही दिवसापासून अहमदनगर - पुणे महा मार्गावरील हाँटेल सह इतर व्यावसायिक व सुपा परिसरातील बंद घराना चोरटे लक्ष करताना दिसत आहेत. तर चोरानी मागील काही महिन्यात अनेक हाँटेलातील दारु वर हात साफ केला आहे. पोलीसांनी रात्र गस्त वाढवण्याची मागणी नागरीक करत आहेत.