घरफोडून सव्वा लाखांसह दागिने चोरले

सावेडी उपनगरातील घटना || पोलिसांत गुन्हा
घरफोडून सव्वा लाखांसह दागिने चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या एका व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी फोडले. एक लाख 20 हजार रूपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एक लाख 65 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. सावेडी उपनगरातील डॉन बॉस्को परिसरात 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी 9 नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडून सव्वा लाखांसह दागिने चोरले
नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा

जगदारसिंग सरदारसिंग सोहते (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी 28 ऑक्टोबर रोजी त्यांचे घर बंद करून मुळगावी हरियाणा येथे गेले होते. त्यांना 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा चुलत भाऊ सुखविंदरसिंग यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल व कंपाऊंडची जाळी तोडलेली दिसत आहे. यानंतर फिर्यादी हे कुटूंबासह हरियाणा येथून निघून त्यांच्या नगर येथील घरी आले. त्यांनी मुख्य दरवाजाचे लॉक उघडून पाहणी केली असता त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसून आले.

घरफोडून सव्वा लाखांसह दागिने चोरले
निळवंडे कालवे चाचणीचा ऑक्टोबर मुहूर्त हुकला

त्यांनी बेडरूममध्ये ठेवलेल्या रकमेची व दागिन्यांची तपासणी केली असता त्यांना रक्कम व दागिने मिळून आले नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की, एक लाख 20 हजार रूपये रोख रक्कम, सोन्याची चैन, कानातील झुंबके असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यांनी 9 नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

घरफोडून सव्वा लाखांसह दागिने चोरले
अटी शर्तींचे उल्लंघन करणार्‍या ‘ईस्मार्ट’ वरील कारवाईचा प्रस्ताव थांबविला?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com