घर फोडून चार तोळ्याचे दागिने चोरले

पोलिसांत गुन्हा
घर फोडून चार तोळ्याचे दागिने चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार (Bhingar) शहरातील नागरदेवळे (Nagardevale) भागात इंद्रप्रस्थ कॉलनीतील घर अज्ञात चोरट्यांनी फोडले (Robberry). घरातून चार तोळ्याचे दागिने (Jewelry) चोरून नेले. 4 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते 5 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

याप्रकरणी योगेश भारत शिंदे यांनी 5 ऑगस्ट रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी योगेश शिंदे यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी आत प्रवेश करून उचकापाचक केली. एक हजार रूपयांची रोख रक्कम तसेच दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, साडेचार ग्रॅमची अंगठी, साडेतीन तोळ्याचे वेल जोड, अर्धा ग्रॅमचे जोड, एक ग्रॅमची नथ असा सुमारे चार तोळ्याचे दागिने लंपास केले.

5 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com