पाटेगावमध्ये भरदिवसा घरफोडी

पाटेगावमध्ये भरदिवसा घरफोडी

दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

कर्जत (प्रतिनिधी) - कर्जत तालुक्यातील पाटेगावजवळील वाघनळी येथे गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील सुमारे 7 तोळे सोने व इतर मुद्देमाल लंपास केला. कुटुंबातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी जेवणाच्या वेळेस घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजाची कडी तोडलेली दिसली.

घरातील कपाटाचे लॉकर तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. पाहणी केली असता ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com