बंद फ्लॅट फोडून पाच तोळे, 50 हजार लंपास

मााणिक चौकातील घटना || कोतवालीत गुन्हा
बंद फ्लॅट फोडून पाच तोळे, 50 हजार लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बंद फ्लॅट फोडून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार रूपये रोख रक्कम असा दोन लाख 54 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. 17 सप्टेंबर सायंकाळी सात ते 20 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान माणिक चौक, नागरे गल्लीतील मधुसुदन अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश विठ्ठलराव साळवे (वय 68) यांनी फिर्याद दिली आहे.

सुरेश साळवे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. 17 सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांचा फ्लॅट बंद करून पत्नीसह तारकपुर येथील मुलीकडे मुक्कामी गेले होते. 20 सप्टेंबर रोजी दुपारी ते मुलीच्या घरी असताना त्यांना काम करणारी बाई कुसुम गुंड यांनी फोन करून घरफोडीची माहिती दिली.

यानंतर साळवे यांनी घरी येत पाहणी केली असता त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसून आले. त्यांनी स्टील व लाकडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये सोन्याचा हार, अंगठी, क्वाईन, ब्रेसलेट, रिंग टॉप्स, नथ, मंगळसूत्र व रोख 50 हजार रूपये होते. साळवे यांनी कोतवाली पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com