
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घर बंद करून कामावर गेलेल्या व्यक्तीचे घर फोडून (Burglary) चोरट्यांनी तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 10 हजाराची रक्कम असा 55 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून (Theft) नेला आहे. केडगाव उपनगरातील दीपनगरमध्ये बुधवारी (दि. 28) सकाळी नऊ ते सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
या प्रकरणी गौरव भास्कर विधाते (वय 21 रा. दीपनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. गौरव विधाते यांच्या आई स्वाती विधाते या एमआयडीसीत (MIDC) कामाला असून त्या बुधवारी सकाळी साडे आठ वाजता कामावर गेल्या होत्या.
गौरव नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्यांच्या डावरे गल्ली येथील पेरणा इंटरप्रायजेस येथे कामावर गेले होते. सायंकाळी साडे सहा वाजता स्वाती विधाते या घरी आल्यानंतर त्यांना घरफोडून (Burglary) दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी मुलगा गौरव यांना फोन करून माहिती दिली. गौरव यांनी घर गाठून पाहणी केली असता, घरातील कपाटामध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्याची सोन्याची पोत (Gold Jewelry) व 10 हजाराची रोकड असा 55 हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. गौरव यांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती देत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.