घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद

भिंगार पोलिसांची कामगिरी: पावणे दोन लाखांचा ऐवज जप्त
घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात चोरी (Nagar City Theft), घरफोडी (Burglary) करणार्‍या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक (Arrested) केली. दिलीप ऊर्फ किरण दत्तात्रय शिंदे (वय 27 रा. नागरदेवळे, भिंगार) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्यांची दागिणे असा एक लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी भिंगारमधील बेलेश्वर मंदिर परिसरात ही कामगिरी केली.

आरोपी शिंदे विरोधात भिंगार कॅम्पसह तोफखाना (Topkhana), पाथर्डी (Pathardi), वानवडी (Vanwadi), शिरूर (जि. पुणे) पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे 10 गुन्हे दाखल आहेत. भिंगारमधील सोनू कांबळे यांनी दाखल केलेल्या घरफोडीचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी शिंदे हा बेलेश्वर मंदिर परिसरात आलेला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, पोलीस अंमलदार ए. एन. नगरे, पी. जी. पवार, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, बी. एस. म्हस्के, संजय काळे यांच्या पथकाने आरोपी शिंदे याला अटक केली.

Related Stories

No stories found.