मुकिंदपूर येथे घरफोडी; 30 हजार लंपास

मुकिंदपूर येथे घरफोडी; 30 हजार लंपास

नेवासा (तालुका वार्ताहर) -

तालुक्यातील मुकिंदपूर येथे घरफोडी होवून 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सेवानिवृत्त शिक्षक बबन बाबुराव पाठक (वय 71) रा. नेवासाफाटा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 डिसेंबर रोजी दुपारी दीड ते 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी साडेसहा पूर्वी या वेळेत केव्हातरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील कपाटात ठेवलेली 30 हजाराची रक्कम (प्रत्येकी 500 रुपये किंमतीच्या 60 नोटा) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. जवळच राहणारे संतोष रामराव बनगर यांचे राहते घरी देखील चोरी झाल्याचे समजले आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 945/2020 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com