गणेशवाडी येथे घरफोडी ; तीन तोळ्याच्या दागिन्यांसह 10 हजार रुपये लंपास

गणेशवाडी येथे घरफोडी ; तीन तोळ्याच्या दागिन्यांसह 10 हजार रुपये लंपास

सोनई (वार्ताहर) -

येथून जवळच असलेल्या गणेशवाडी (ता. नेवासा) येथे बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा

कडीकोयंडा तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 हजार रुपयांची रक्कम असा ऐवज चोरुन नेला आहे.

याबाबत कचरु यादव दारकुंडे यांनी सोनई पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर थोरात व पथकाने भेट देवून पंचनामा केला. सकाळी दहा वाजता श्‍वानपथक येवून गेले. बाजूच्या रस्त्यापर्यंत श्‍वान पथकाने माग काढला. गावात मागील आठवड्यातही चोरीचा प्रकार झाला होता.

दारकुंडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 119/2021 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरातील लोखंडी पेटीत ठेवलेल्या डब्यातून तीन तोळ्याचे जुने मणीमंगळसुत्र व कानातील सोन्याचे फुल तसेच रोख दहा हजार रुपये चोरीला गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास आर.आर.लबडे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com