दिवसा घरफोड्या करणारा सराईत गजाआड

एलसीबीची कामगिरी; 29 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
दिवसा घरफोड्या करणारा सराईत गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डी व नगर तालुक्यात दिवसा बंद घरे फोडून चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केला आहे. स्वरूप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळेे (वय 25 रा. अंतापूर ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून 11 लाख 20 हजार रूपये किंमतीचे 29 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. कल्पना विलास साठे (वय 48 रा. नारायणडोह ता. नगर) या 1 जुलै, 2022 रोजी दुपारी घराला कुलूप लावून गावात आलेल्या दिंडीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या.

यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख 62 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरली होती. कल्पना साठे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, बापुसाहेब फोलाणे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, राहुल सोळंके, संतोष लोढे, लक्ष्मण खोकले, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, जालिंदर माने, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे यांचे पथक काम करत होते. सदरचा गुन्हा गुंड्या काळे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी गुंड्या काळे याचा शोध घेवून त्याला अटक केली. त्याने विविध गुन्ह्यात चोरी केलेले 29 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले.

तीन गुन्ह्यांची कबुली

स्वरूप उर्फ गुड्या डिस्चार्ज काळे याने तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. त्याने नारायणडोह येथील घरफोडीसह मिरी (ता. पाथर्डी) व मोहटा देवीजवळील गावात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. पुर्वी त्याच्याविरूध्द औरंगाबाद व नगर जिल्ह्यात दरोड्याचे सहा गुन्हे पाथर्डी, गंगापूर, वाळुंज पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com