सावेडीत दिवसा घरफोडी

32 हजारांचे दागिणे चोरले
सावेडीत दिवसा घरफोडी

अहमदनगर । प्रतिनिधी । Ahmednagar

बंद घराचे कुलूप तोडून घरातील 32 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. सकाळी सव्वा सात ते साडेआठच्या दरम्यान सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आस्मा अफसर शेख (वय- 30 रा. प्रेमदान हाडको, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सकाळी सव्वा सात वाजता त्यांच्या घराला कुलूप लावून शेजारी राहत असलेल्या आई-वडिलांच्या घरी गेल्या होत्या. फिर्यादी घरी नसल्याचे लक्षात येताच घरावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटामधील गलसर, कानातील दागिणे, मणी असे दीड तोळे सोन्याचे दागिणे चोरून नेले. साडेआठच्या सुमारास फिर्यादी घरी आल्यावर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हारूण मुलाणी यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अभंग करीत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com