रुग्णालयात उपचार घेणार्‍या व्यक्तीचे घर फोडले

कोतवालीत गुन्हा
रुग्णालयात उपचार घेणार्‍या व्यक्तीचे घर फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य व 20 हजार रुपये रोख रक्कम असा 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

11 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान बाबा बंगाली चौक, जुने कलेक्टर ऑफीस जवळ ही घटना घडली. कमरोद्दीन ईस्माईल शेख (वय 75) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आजारी असल्याने त्यांना 11 फेब्रुवारीला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी तेथे असल्याने घराला कुलूप होते.

चोरट्यांनी फिर्यादीचे घर फोडून सामानाची उचकापाचक केली. घरातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य व 20 हजार रुपये रोकड असा 58 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान फिर्यादी यांना 27 फेब्रुवारी रोजी सुट्टी झाल्याने ते घरी गेल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com